filename
stringlengths
5
8
image1
imagewidth (px)
1k
1k
image2
imagewidth (px)
1k
1k
text
stringlengths
10
452
1089.jpg
मी आपला निबंध वाचीन कळावे हे विनंती नारायण गोविंद चापेकर
109.jpg
करून यैसे बोलिले दादाजी पंताचे पुत्र रखत करून यैसे बोलिले दादाजी पंताचे पुत्र रखमाजी पंत यांस नाईकानी अपणाजवल ठेविले त्यावरी राजश्री स्वामीनी हुकूम केला की वरकड मावळचे देशमुख व तुम्ही येके जागा
1090.jpg
श्री जस्टीस रानडे यांचा बंगला लोणावळे २६ ५ १५ रा रा चिटणीस भारत इतिहास संषोधक मंडळ पुणे यांस नमस्कार वि वि आपलेकडून मंडळाच्या तृतीय वार्षिक संमेलनाची निमंत्रण पत्रिका
1091.jpg
आली ती पावली त्याब मी आपली आभारी आहे काही विशेष कारणाकरिता मला संमेलनास हजर राहता येत नाही याब वाईट वाटते तथापि
1092.jpg
मंडळाच्या कामाब माझी पूर्ण सहानुभूती आहे हे लिहावयास नकोच कळावे हे विनंती रमाबाई रानडे
1093.jpg
सरकार दौलतमदार कंपणी इंग्रज बाहादूर मुकाम सातारा रामचंद्र गंगाधर जोसी सातारीयाहून पुण्यास जातात आणि तेथून माघारी येतील सभागये हत्यारबंद आसामी दाहा व बिनहत्यारी माणसे दाहा व घोडी लाहन मोठी रास च्यार यास मार्ग
1094.jpg
१ भोईज २ घाट खमटगी ३ खंडाले ४ सिरोल ५ कातरज घाट ६ पुणे सदरहू मार्गे जातील व येतील यास राहदरमियान हरकोणी मुजाहिम न होता जाऊ व येऊ देणे हे दस्तक मुदत
1095.jpg
माहे २ दोन उपरांतीला नामंजूर मानणे जाणिजे तारीख २६ मार्च सन १८२० इसबी मुो छ ११ जम खर सु असरीन मयातेन व अलफ
1096.jpg
श्री रा रा भारत इतिहास संशोधक मंडळाचे चिटणीस मुकाम पुणे यांस सा नमस्कार वि वि सोबत आपलेकडून आलेले निबंध कंपोजकरून त्याची तीन प्रुफें यासोबत पाठविली
1097.jpg
आहेत तरी तपासोन सत्वर इकडे पाठविण्याचे करावे म्हणजे पेजकरून पुन यकवार प्रुफें आपलेकडे हुकमा करिता पाठऊ कळावे लोभ असावा हे वि आपला
1098.jpg
बडोदे ता २३ ८ १९१३ कृतानेक सा नमस्कार विनंती मजला काही बाबतींची माहिती मिलविण्याकरिता पुण्यास यावयाचे आहे तेथे रा रा राजवडे इतिहासकार
1099.jpg
इतिहासकार ह्याची गाठ पाहिजे तरी ते हाली कोठे आहेत आणि पुढील १५ २० दिवसात ते तेथेच असतील किंव नाहीत ते कलविल्यास मेहरबानी होईल रा ब पारसनीस तेथे आहेत काय
11.jpg
न स्वकीय कुशल लिहित जावे विशेष तुम्हाकडून जी जी पत्रे आली होती त्याची उत्तर समर्पक पेशजी पाठवण्यात आली त्या आलीकडेस तम्हाकडन पत्र येऊन वर्तमा
110.jpg
बैसोन त्याचा मुदा मनास आणवणे त्यावरी कान्होजी नाा व अवघे मावळचे देशमुख येके जागा बैसले तेव्हा अवघे देशमुख बोलीले की तुमचा विचार काये तो सांगणे तेव्हा बोलिले की आम्ही राजश्री स्वामीच्या पायांसी ईमान धरून वतनास
1100.jpg
भा इ सं मंडळाचे वर्गणीदार होण्या ब आपले पत्र आले आहे त्याचा जबब समक्षच देईन कळावे लोभ कराव हे विनंती गो स सरदेसाई
1101.jpg
कृतानेक सां नमस्कार वि वि उदईक बुधवार ता २१ ५ ४१ रोजी मंडळाचे कार्यकारी मंडळाची सभा सायंकाली ५ वाजता आहे आपण
1102.jpg
आपण मंडळाचे हिशेबासंबंधी केलेल्या लेखी सूचना व शेरे सदरसभेत ठेवणार आहोत तथापि आपण त्यावेळी समक्ष हजर राहिल्यास
1103.jpg
समक्ष सर्व खुलासे करण्यास सोईचे होईल सबब आपण उदईक सदरसभेस हजर राहण्याची जरूर कृपा करावी असी विनंती आहे कळावे हे वि मी ६ वाजता येईन आपला मं भा मुजुमदार चिटणीस
1104.jpg
नंबर सन १८८४ भाडघर तारीख १४ माहे आकटबर १८८४ अर्जदार काळू बिन शेटी राहुत राहणार किकवी यास कळविण्यात येते कि जर तुम्ही ५०० बरासचे खड़ी
1105.jpg
फोडण्याचे कनट्रकट कॉन्ट्रेक्ट घेण्याचा असल्यास दरबरासी ब्रास १७६ भाव मिळेल खड़ी फोडण्यास चिपा व लहान दगड हे तयार आहेत मोठे दगड फोडून खडीकरिता लहान दगड करण्याची
1106.jpg
जरूर नाही तरी त्याप्रमाणे मर्जी असल्यास ठराव करण्याकरिता भाडघर येथे आम्हास येऊन भेटण्याचे करावे कळावे तारीख मजकूर आ इंजिनियर भाडपर
1107.jpg
श्री पुणे मुमुक्षु कचेरी ता २९ ३ १६ रा रा सेक्रेटरी सो भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे सा न वि वि माझ्या व्यंकटेश स्तोत्राची जुनी हस्तलिखित प्रत आपण घेतली आहे ती आमचे
1108.jpg
कारकून पाठविले आहेत त्यांजबरोबर पाठवून देण्याची कृपा करावी मला त्या प्रतीची गरज आहे शके १८३७ ची वर्गणी रु १२ मला देणे आहे ती
1109.jpg
४ २ दिवसात पाठवितो नवीन साली माझे नाव वर्गणीदाराचे लिस्टातून कमी करावे हे वि आ लक्ष्मण रामचंद्र पांगारकर
111.jpg
देखील पाणी सोडिले आम्ही व आपले लेक देखील राजश्री स्वामी पुढे खस्त होवे यैसा आमचा दृढ विचार आहे तुमचा मुदा काये तो बोलणे मुसलमान बेईमान आहे कार्य जालियावरी
1110.jpg
व्हिक्टोरिया कॉटेज महाबलेश्वर ता २१ ५ २३ राजमान्य राजश्री दत्तो वामन पोतदार चिटणीस भारत इतिहास संशोधन मंडळ पुणे यांस भवानराव श्रीनिवासराव पंडित प्रतिनिधी सं औंध नमस्कार विनंती विशेष
1111.jpg
तुमचे तारीख १६ ५ २३ इसवीचे पत्र पावले आम्ही यामहिनाअखेर औंधास जाऊ तेथे गेल्यावर तुमचे पत्राचा विचार करू कळावे हे विनंती चीफ ऑफ औंध
1112.jpg
श्री प्रामेसरी नोट शके १८५९ प्रमाथी नाम संवत्सरे माहे वैशाख शु १३ रोज सोमवार तारीख १ माहे में सन १९३९ इ ते दिवसी प्रामेसरी नोट लिहून घेणार रा बाबाजी रामजी सांळूके
1113.jpg
सांळूके राहणार सावरदरे तो पुरंदर जि पुणे यासी प्रामेसरी नोट लिहून देणार रा तुकाराम मारुती सांळूके रा पांडे तो व जि मजकूर कारने प्रामेसरी नोट लिहून
1114.jpg
देतो कि मी तुमचेपासून घरखर्चाकरीता रोख रुपये सुर्ती १५० अक्षरी दीडसे यासी व्याज दरमहा दर रुपयास पैश्याप्रमाणे देईन हे रुपये मी रोख घेऊन
1115.jpg
भरून पावलो हे रुपये तुम्ही मागाल त्यावेळी मागाल त्याठिकाणी देईन काही एक सबब व तक्रार सांगणार नाही ही प्रामेसरी नोट लिहून दिली सही दस्तुर खंडो नारायण काळे
1116.jpg
राजीनामा विद्यमान रावबाहदुर रामचंद्र दाजी नगरकर लवाद यांस १ बलवंतराव गणेश नगरकर राहणार पुणे पेट कसबा वादी १ दामोदर गणेश नगरकर राहणार शहर पुणे पेट कसबा २ हरी गणेश नगरकर राहणार शहर पुणे पेट कसबा
1117.jpg
दाव रुपये या कामात उभय पक्षकारांचे दरम्यान वाटणी संबंधाने वाद पडल्यामुळे वादींनी आपल्याकडे नगर जिल्ह्यातील घर वाडे वगैरे व रत्नागिरी जिल्ह्यातील जमिनी व घरे वगैरे खेरीज
1118.jpg
करून बाकी इष्टेटीचे वाटणीची फिर्याद दिली आहे सबब आम्ही उभय पक्षकार मिळून आपल्यास लवाद नेमले आहे जो आपण निकाल कराल तो आम्हास कबूत आहे व मान्य आहे इ तारीख ३० ७ १३ साक्ष १ काशिनाथ गंगाधर गोडबोले दस्तुरखुर
1119.jpg
श्री पुणे फाल्गुन शु मंगळवार कृतानेक सां नमस्कार वि वि रा रा शंकरराव देव हे आताच अकल्पित घरी येताना भेटले ते दामले यांचे घरी उतरले
112.jpg
नस्ते निमित्य ठेऊन नाश करील हे महाष्ट राज्य आहे अवधियांनी हिंमत धरून जमाव घेऊन राजश्री स्वामी संनीध राहोन येकनिष्टेने शेवा करावी यैश्या हिंमती
1120.jpg
असून आज दुपारी धुळ्यास जात आहेत आपणाकडे येण्यास त्यांस वेळ सापडला नाही तरी रा चांदोरकर यांजकडे पाठविण्याची पुस्तके देण्याची असल्यास
1121.jpg
ती आलेल्या इसमाबरोबर पाठविल्यास रा शंकर रावांकडे पाठविली जातील २ भीमस्वामीचा मृत्यूशक १६६३ आहे तेव्हा नरहरी मोरेश्वर हा त्यांचा शिष्य होऊ शकेल
1122.jpg
३ समर्थकालीन पत्रव्यवहार चैत्र शु ९ चे सुमारास प्रसिद्ध होईल आतील मजकूर छापून झाला व प्रस्तावनाही निमी जाहली येणे प्राो
1123.jpg
हकीकत आहे कळावे लोभ असावा हे विनती पांडुरंग पटवर्धन
1124.jpg
रा रा गोपाळराव कुलकर्णी यांस रा कृष्णाजी वासुदेव पुरंदरे याचे नाव हजेरीपटात मांडून त्याचे दिवस १३ हजर
1125.jpg
मांडून दरमहा ३५ रुपयेप्रमाणे १३ दिवसाचा आकार रु १५ ७ १५ रु ३ आणे त्यांना द्यावा व त्यांची सही घ्यावी कळावे दत्तात्रय विष्णु आपटे
1126.jpg
श्री सा न वि वि आपले कार्ड १७ १ चे पावले प्रो सरकार यांनी फारसी खंड छपवयाचे कबूल केले असेल तर त्यांस लिहून
1127.jpg
कागद त्यांजकडे पाठवावे म्हणजे ते काम करतील आता ते औरंगजेबाच्या कामातून निवृत्त झाले आहेत सबब
1128.jpg
त्यांस फुरसतही असेल असे मला वाटते आपल्यास लिहावे म्हणजे ते जबाब देतील कळावे लोभ करावा हे विनंती गो स सरदेसाई
1129.jpg
श्री कृष्ण शेंदुर्णी कार्तिक शु ६ शके १८४७ रा रा बापू साो गाडगीळ चरणी सेवेसी कृतानेक शिरसाष्टांग नमस्कार विज्ञापना विजयादशमीचे पत्र यथाकाल
113.jpg
करीना जेधे देशमुख ताा भोर किले रोहिडा करीना यैसा जे आपल्या वडिलाची व खोपडीयाची वांटणी दिवाणाने व गोताने
1130.jpg
मिळून फार आनंद झाला भाद्रपदअखेर आबासाो कोलटकर यांचे कुटुंब शेवटचे दुखण्यात आजारी होते पुढे अश्विन व ७ त्यांनी इहलोक सोडला त्यांच
1131.jpg
उत्तम झाले याचे चिरंजीव सपत्नीक त्यांना भेटण्यास आले त्यावेळी काकुना थोडा आराम वाटला तेव्हा ते परत लोणावळ्यास गेले त्याच
1132.jpg
वेळी मी ही औरंगाबादेस एक तक्ता दाखल करणेचा होता म्हणून जात होतो तेव्हा ते सर्व त्यासंधीचा फायदा घेऊन माझे बरोबर औरंगाबादेस येऊन वेरूल दौलताबाद येथे लेणी व किल्ला पाहून
1133.jpg
घृष्णेश्वर दर्शन घेऊन आले कुमारी दुर्गा तेथे होती व तिने ही स्थाने पाहिली नव्हती म्हणून तिलाही बरोबर नेली होती
1134.jpg
नंतर मी नाशिकाला जाऊन पुण्यास चिरं सौ चंपूबाई भिडे आण्णासाो जेष्ट कन्या फार आजारी होती म्हणून तिला भेटून आलो विजया
1135.jpg
दशमीस परत आलो कुमारी वेणूही आता उपवर झाली आहे मला वरानवैषण कसे करावे हे अद्याप येत नाही पण अभ्यासाने येईल असे ठरीवावे तरी त्याब वाटणारी भीती अदयाप
1136.jpg
गेली नाही कुमारी दुर्गा करिताही शक्य ती ती खटपट करीन हे मी लिहिणे जरूरच आहे गेले सबंध मास येथे उष्मा फार तीव्र आहे
1137.jpg
श्री सा नमस्कार वि वि मला वाटते कि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ संस्थेच्या पदवीदान समारंभास मंडळाचा दिवाणखाना देण्यास पास केलेल्या ठरावा प्राो सु काही
1138.jpg
हरकत असू नये वाङमय याशब्दात प्रत्यक्ष आचार ज्यात नाही असे राजकीय विषयाचे तात्त्विक अध्ययन अध्यापन येऊ शकते मुंबई युनिव्हर्सिटीच्या पदवीदान
1139.jpg
समारंभाचे वेळी केल्याजाणाऱ्या भाषणात ज्या प्रकारचा राजकिय प्रश्नाचा ध्वनी केव्हा केव्हा उमटत असतो त्या प्रकारचा दुसऱ्या बाजूचा ध्वनी सदरहू पदवीदानाचे वेळी उमटला
114.jpg
केली भोर तरफ जेध्याचे वांटणीस आली उत्रोली तरफ खोपडी याकडे आली त्यास भोर तर्फेची लावणी उगवणी जेध्यानी केली
1140.jpg
असे गृहीत धरून चालले तरी समारंभ बाङमयात्मकच आहे असे मी स्वत समजेन पण वस्तुत समारंभाचे वेळी काय काय भाषणे होणार वगैरेची चर्चा आपणास करण्याचे कारण नाही
1141.jpg
एखाद्या सरकारी खात्याने ते केले तर शोभेल मागताना एका वाङमयात्मक समारंभाकरिता मागणी केली जात आहे व आपणही तिचा आनंदाने स्वीकार करावा कळावे हे श्री कृ बेलवलकर
1142.jpg
ता २८/१/२३ श्री श्री प्रो दत्तोपंत दादा यांना कृतानेक सा नमस्कार विज्ञापना वि दोन तीन वेळा भेटीस आलो भेट झाली नाही आबासों ही अद्याप आले नाहीत हिशेब पुरा करून ठेविला आहे आबा सो
1143.jpg
उद्या येताच रुजवात घेईन व लगेच पक्का हिशेब लिहून सर्व व्यवहार पुरे करीन वचनाला जागणे मला इष्ट वाटते काही व्ही प्या व इतर किरकोळ
1144.jpg
कामे माझ्या हातूनच पुरी झाल्यास मला समाधान वाटून कार्यदृष्टीने थोडी शिस्तही राखली जाणार आहे तत्पूर्वी हिशेबी व्यवहार पुरा होणे रास्त
1145.jpg
म्हणोन तो पुरा करीत आहे मंडळाकडे आपली येण्याची वेळ मला भेटण्यास गैरसोईची असल्यानेच विचार विनिमय झाला नाही आज्ञा होईल तर स्थानिक
1146.jpg
वर्गणी होईल तेवढी भय्या द्वारे वसूल करता येईल उद्या सकाळी घरी ९ वाजता येऊ काय कळावे
1147.jpg
श्री गणेशाय नम कल्याण ता ४ जानेवारी १९२७ मि पौष शुद्ध १ मंगळवार शके १८४८ राजमान्य रा चिटणीसजी भा इ सं मंडळ पुणे साो सेवेशी कृतानेक सा नमस्कारपूर्वक विज्ञप्ती अशीकी आपले ता ३ १ २७ चे पत्र कै राजवाडे यांच्या अकाली मरणाब दुखवट्याची सभा मंडळात
1148.jpg
ता ६ १ रोजी होणार म्हणून आले ते पावले मला येणे अवश्य होतेच पण येववत नाही पंगु झालो आहे त्यामुळे नाईलाज आहे सभेच्या कार्याविषयी माझी पूर्ण संमती आणि सहानुभूती आहे
1149.jpg
इतिहास संशोधन कार्याची मोठी हानी झाली आहे ती भरून येणे कठीणच तथापि मंडळाने नेटाने जोराने काम पुढे चालबावे अशाविषयी ता २ १ २७ रोजी आपणास पत्र लिहिले आहे
115.jpg
किलांचा कसाला केला पातशाही हुकुमे जमाव बराबरी घेऊन मसलती केल्या युध्याची शर्त केली दिवाणकामे केली त्यावरून पातशाहा मेहरबान होऊन आपले वडील
1150.jpg
ते आपण माझा संदेश म्हणून सभेपुढे वाचावे २ भा इ सं मंडळ ही संस्था कै राजवाडे यांचे स्मारक आहेच दुसरे काही स्मारक करणे तर त्यांचे अनेक मासिकपत्रांत व वृत्तपत्रांत
1151.jpg
आलेले लेख विषयवार शुद्ध असे छापून काढावे अशी माझी सूचना आहे येणेकरून विखुरलेले त्यांचे लेख व निबंध
1152.jpg
संशोधनपूर्वक पुनःप्रकाशित होतील असे रा रा सदाशिवराव दिवेकर यांचेही मत आहे व ते सभेपुढे ते मत
1153.jpg
सुचविणार आहेत सारांश सभेविषयी माझी पूर्ण सहानुभूती आहे ते आपणास कळावे हे विनंती काशिनाथ नारायण साने ४ १ २७
1154.jpg
पुणे ता ११ माहे ज्यानेवारी १९०८ राजमान्य राजश्री धरणीधर गणेश देव पुणे सा नमस्कार वि वि आपण प्लेग संबंधाने मुकाम मुंढवे येथे हडपसर स्टेशननजीक खराडकर यांचे चाळीत आमचे जाग्याचे वाटणीत राहण्यास
1155.jpg
आला होता त्याचे भाडे माहे सपटेंबर १९०७ ता २० पासून माहे ज्यानेवारी १९०८ ता ३१ पावेतो रुपये २९ आम्हास आपल्या कडून मिळाले ते आम्ही घेऊन भरून पावलो कळावे हे वि
1156.jpg
श्री शीव २८ ५ १५ श्रीमंत रा खंडेराव चिंतामण मेहेंदळे चिटणीस भारत इ सं मंडळ यांसी कृतानेक सा नमस्कार वि वि
1157.jpg
१ मंडळाच्या यंदाच्या संमेलनासाठी मी येणार होतो परंतु श्री स्वामी रामतीर्थ यांचा ८ वा भाग ४ ८ दिवसात प्रसिद्ध व्हावयाचा
1158.jpg
असल्यामुळे येथून तूर्त बाहेर जाता येणे शक्य नाही याबदल अतिशय वाईट वाटते संस्थेला कायमचे स्वरूप देण्यासंबं
1159.jpg
धाची योजना यंदाच्या बैठकीत निश्चित करण्यात येईल अशी मला आशा आहे मी आपल्याला पूर्वी समक्ष सांगितल्याप्रमाणे
116.jpg
च्या गोष्टी सांगितल्या तेव्हा अवघे देशमुख बोलिले की तुमचा विचार तोच आमचा विचार ईमान पुरस्कर आहे यैसे बोलिले तेव्हा अवघे देखमुख घेऊन राजश्री स्वामी
1160.jpg
इमारत फंडासाठी रुपये १०० शंभर देण्याचे ठरविले आहे आणखी १५ दिवसांनी पुण्यास येत आहे व पाच सहा महिने
1161.jpg
कामानिमित्त तेथे राहावयाचे आहे आल्यावर आपणास भेटेनच २ शके १८३६ च्या अहवालाची प्रत माझे स्नेही रा शंकरराव जोशी
1162.jpg
हे आपणाकडे येतील त्यांचेजवळ द्यावी म्हणजे मला पोहोचेल शेवेसी श्रुत होय हे आपला रामकृष्ण वासुदेव बर्वे
1163.jpg
रसीब नाट पेट लखोट्याची जिल्हा पुणे येथील जनराल पोष्टआफिसातून परशराम अनंत जोशी यांचे नावचा लखोटा त्याजला
1164.jpg
त्याजला मौजे पुसाळे वाडा बसणी येथे पावता होणेकरिता नारो गोविंद आगाशे याचेघरी रत्नांगिरीस जाणेकरिता हरी अनंत जोशी याजकडून आलेला
1165.jpg
आज तारीखेस रवाना केला असे तारीख १९ माहे जुलई सन १८५३ इसवी ऊर्फ आषाढ शुद्ध १३ शके १७७५ प्रमाथी नाम संवत्सरे सन १२६२ फसली
1166.jpg
वडीलसाहेबाचे सेवेसी आपत्याचा सा नमस्कार विज्ञाप ना ता फाल्गुन शु ८ पावेतो मु उरवडे येथे वडील साहेबाचे आसीर्वाद सुखरूप आसो विशेष आपण
1167.jpg
तिकडेस जाऊन पंधरा दिवस होत आले परत येणे जाले नाही चिरंजीव राजमान्य राजश्री बंधुसाहेब आपले बराबर आहेत त्यांची आत्याबाई येथे मार्गप्रतीक्षा
1168.jpg
मार्गप्रतीक्षा करीत आहेत त्याची इकडील काम आटोपून पुन्हा परत जाण्यास दिवसगत लागती त्यास आपल्यास तेथील कामामुळे आवकाश आसेलच
1169.jpg
आसेलच तरी त्यांची रवानगी करून द्यावी आसे बाई चे सांगणे आहे कळावे बहुत काय लिहू सेवेसी
117.jpg
स्वामी संनिध अले अवघ्यांनी शफत केली मग अवघ्यास भोजनास घातले त्यावरी अगदी मावलचा जमाव केला राजश्री पंताची गोपींनाथ हेजिबीस पाठविले प्रतापगडाखाले भेटी
1170.jpg
श्रुत होय हे विज्ञापना
1171.jpg
चिरंजीव राजमान्य राजश्री बंधुसाो यासी आसीर्वाद सदरी वडीलसाहेबास लि आहे त्यावरून
1172.jpg
त्यावरून कलेल इकडेस लौकरच येण्याचे करा वे बहुत काय लिहिणे लोभ करावा हे आसीर्वाद
1173.jpg
श्री राम समर्थ पुणे दि १० १२ ५६ श्रीयुत शंकरराव जोशी पुणे सन्मित्राचे सेवेशी सादर सा नमस्कार विज्ञापना कै गुरुवर्य तात्यासाहेब केळकर
1174.jpg
यांचेनिमित्त पुणे विद्यापीठा तर्फे आपणास व्याख्यानमाला गुंफण्याचा अपूर्व मान मिळाला
1175.jpg
याबदल मला तुमच्याबदल काय बाटते ते शब्दांनी व्यक्त करणे अशक्य आहे तुमच्या या व्याख्यानमालेचा विषय माझ्या शक्ती बाहेरचा
1176.jpg
असला तरी केवळ आपण बोलणार म्हणून मी सर्व व्याख्यानास हजर रहाण्याचे ठरविले होते
1177.jpg
पण पहिल्या व्याख्यानाचे दिवसी सार्वजनिक सभेची सभा असल्यामुळे देणे अशक्यच होते पण पुढील सर्व
1178.jpg
व्याख्यानास हजर राहून तो विषय न समजला तरी आपल्या अभिनंदनार्थ शेवटी आनंदाने टाळ्यातरी वाजवावयाच्या